Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड-19 लसीचा शुभारंभ

निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड-19 लसीचा शुभारंभ


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) आज सोमवारी ( ता.25 ) रोजी  उपजिल्हा रुग्णालयात कोविड-19 लसीचा शुभारंभ  निलंगा प.स.चे सभापती श्रीमती सौ.राधा बिराजदार याच्या हस्ते करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप सौंदळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड -19 लस देण्यास चालु आहे. निलंगा तालुक्यातील कोविड -19 लसीचे प्रथम लाभार्थी आरोग्य कर्मचारी दत्तात्रय म्हेत्रे यांनी प्रथम लस घेतली. कोविड विरोधात आपल्या भारताचं सुरक्षेतेच्या दिशेने पहिले पाऊल आहे तरी सर्वांनी कोविड -19 ची लस घ्या असे आवाहन दत्तात्रय म्हेत्रे यांनी केले. या शुभारंभ प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर , शिवसेना तालुका प्रमुख अविनाश दादा रेशमे , पोलिस निरीक्षक अनिल चोरमुले , वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप सौंदळे , गटविकास अधिकारी अमोल ताकभाते , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कदम , डॉ.सोळुंके , डॉ.पाटील , डॉ.चव्हाण मॅडम , डॉ.माने मॅडम , श्रीमती सुरेखा माने ,श्रीमती अंजुम सौदागर व उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments