Latest News

6/recent/ticker-posts

चाकूर शहराच्या जवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मेंढपाळ मुलांचा मृत्यु

चाकूर शहराच्या जवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मेंढपाळ मुलांचा मृत्यु


चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} चाकूर शहराच्या वस्तीवाढीच्या पाठीमागील  तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मेंढपाळाचा पाण्यात बडून मृत्यु झाल्याची घटना रविवारी (ता.२४) दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. शहराच्या जवळ वस्तीवाढ भागात एक तलाव असून या तलावातील  पाण्यात बडून दरवर्षी मृत्यु होतात, तलावाच्या शेजारील शेतात मेंढपाळाची टोळी बसलेली असून यात दोन मुले रविवारी दुपारी पोहण्यासाठी तलावाकडे गेले होते. बऱ्याच वेळ झाल्यानंतर ही मुले शेताकडे वापस आले नसल्यामुळे शोधण्यासाठी गेले असता तलावाच्या कडेला मुलांची कपडे आढळून आली. याची माहिती पोलीसांना दिल्यानंतर पोलीस अंमलदार रामचंद्र गुंडरे, पाराजी पुठ्ठेवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. रिपाईचे तालूकाध्यक्ष पपन कांबळे यांनी तलावात जाऊन शोध घेतला असता दोन्ही मृतदेह त्यांच्या हाती लागले. वैभव राजकुमार मसुरे (वय १३) रा. हाळी (ता.उदगीर), कृष्णा गोविंद कमलापुरे (वय १६) रा. मुरंबी ता. लोहा अशी मयत मुलांची नावे असून याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments