काँग्रेसच्या निलंगा तालुका अध्यक्ष पदी पाटील तर शराध्यक्षपदी शिंगाडे
निलंगा:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) कॉंग्रेसच्या निलंगा तालुकाध्यक्षपदी विजयकुमार विष्णुपंत पाटील यांची फेरनिवड तर शहराध्यक्षपदी गोविंद रामजी शिंगाडे यांची निवड करण्यात आली आहे .
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा महसूलमंत्री ना बाळासाहेब थोरात, माजी मंत्री दिलीपराव देशमुख व पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून जिल्हाअध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी विजयकुमार पाटील यांची निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्ष पदी फेरनिवड केली आहे. तर निलंगा शराध्यक्षपदी गोविंद शिंगाडे यांची निवड करून निवडीचे पत्र दिले आहे. या निवडीबद्दल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळुंके, पंडितराव धुमाळ, सुधाकर पाटील, लाला पटेल, मोहनराव भंडारे, प्रा राजेंद्र सूर्यवंशी, सुरेंद्र धुमाळ, अनिल अग्रवाल देवदत्त पाटील, प्रा दयानंद चोपणे, अजित निंबाळकर, अजगर अन्सारी, जिल्हा बँकेचे व्ही जी शिंदे, संजय माने, मंगेश चव्हाण, राजू पांचाळ आदींनी अभिनंदन केले.

0 Comments