लातूर जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन बाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय जाहीर केलेला नाही
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी जी शेख) समाज माध्यमावर लातूर जिल्ह्यात लॉकडाऊन डाऊन जाहीर झाल्या बाबत चुकीची माहिती फिरत आहे. जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन बाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय जाहीर केलेला नाही तरी नागरिकांनी फेक न्युज पासून दूर राहावे व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी ट्विटर सोशल नेटवर्किंग,मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळावरून कळविले आहे.

0 Comments