Latest News

6/recent/ticker-posts

औसा-एरंडी सारोळा रोडवरील पूल खचल्याने आपघात वाढले;पूल दुरुस्तीची नागरिकांची मागणी

औसा-एरंडी सारोळा रोडवरील पूल खचल्याने आपघात वाढले;पूल दुरुस्तीची नागरिकांची मागणी


औसा:(तालुका प्रतिनिधी/बी डी उबाळे) औसा-एरंडी सारोळा रोडवरील पूल मधोमध खचल्याने तो खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात सतत किरकोळ आपघात होत आहेत यामुळे हा पूल दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की,नेताजी सावंत सर,श्रीराम विद्यालय एरंडी - सारोळा तालुका औसा हे MH- 24 AS-1502 DZIRE कार मधून रविवार दिनांक 21 फेब्रुवारी 2021 रोजी औसा ते सारोळा जात असताना सकाळी 9:00 ते 9:30 च्या दरम्यान संजय गायकवाड यांच्या शेतीजवळ वळणावरून गाडी वळवीत असताना समोरून ऑटो रिक्षा वेगात आल्याने व रस्त्याच्या कडेने मोठ्या प्रमाणात झाडे असल्याने तसेच कॉर्नर जवळील पुलावरील रस्ता मधोमध खचलेला असल्यामुळे, खड्डा चुकविण्याच्या नादात कार पुलावरील कठड्याला धडकली व डाव्या साईडचे समोरील चाक पुलाच्या खाली गेल्याने गाडीचे रेडिएटर फुटले.

  


    तसेच गाडीचे इतरही समोरील काही नुकसान झालेले आहे प्रसंगावधान राखून ब्रेक व हँडब्रेक लावल्याने खूप मोठा अनर्थ टाळला अन्यथा गाडी पुलावरून खाली कोसळणार अशी स्थिती निर्माण झाली होती अशा या भयानक घटनेनंतर गावातील बहुतांश सुज्ञ पालक- नागरिक आजी-माजी विद्यार्थी यांनी प्रयत्नाची पराकाष्टा करून तसेच शेतकरी बळीराम जाधव यांनी आपले ट्रॅक्टर आणून पुलावरून खाली घसरत असलेली गाडी ट्रॅक्टर लावून दोरीच्या साह्याने गाडी हळूच बाहेर काढली जीवित हानी टळली आहे. परंतु गाडीचे नुकसान झालेले आहे कॉर्नरवर पुलावरील रस्ता मधोमध खचल्याने हे वळण खूपच जीव घेणे- धोकादायक बनलेले आहे. त्यामुळे या वळणावरील पुल दुरुस्तीची मागणी एरंडी व सारोळा ग्रामस्थांकडून केली जात आहे. प्रशासनाने याकडे लवकर लक्ष वेधून पुल दुरुस्ती करण्याची मागणी समस्त दोन्ही गावातील ग्रामस्थांकडून केली  जात आहे. जेणेकरून होणारे आपघात टळतील.

Post a Comment

0 Comments