Latest News

6/recent/ticker-posts

नळेगाव येथे २१ वर्षापासून शिवजयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन;सर्व धर्मियांचा उत्स्फूर्तपणे सहभाग

नळेगाव येथे २१ वर्षापासून शिवजयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन;सर्व धर्मियांचा उत्स्फूर्तपणे सहभाग


२१ वर्षापासून सामाजिक उपक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन, सर्व धर्मियांचा उत्स्फूर्तपणे सहभाग, अनिल चव्हाण यांचे ५५ वे रक्तदान, प्रत्येक वर्षी ३०० हून अधिक जनांचे रक्तदान

नळेगाव:(प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नळेगाव येथे शिवजयंती महोत्सव समिती व अनिल चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यातआले होते. मागिल २१ वर्षापासून रक्तदान शिबिरास भरभरून प्रतिसाद मिळत आला आहे. शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजीमहाराज चौकात छत्रपती शिवरायांची ५१ फुट उंचीची भव्यदिव्य प्रतिमा उभी करण्यातआली होती. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यातआले. रक्तदान शिबिराचे उदघाटन शिवबसव प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. यावेळ माजी उपसरपंच सुर्यकांत चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य नारायण मुंजाने, युवा नेते व सामाजिक कार्यकर्तेअनिल चव्हाण, पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम पारवे, ग्राम स्वराज अध्यक्ष धनराज पाटील, सरपंच ताजोद्दीन घोरवाडे, पांडुरंग रेड्डी, दयानंद मानखेडे,सुर्यकांत सावंत, सुभाष शेलार, लिंबाळवाडीचे सरपंच शरद बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य उमाकांत सावंत, शाम मुंजाने, अशपाक मुजावर, सतिश पांडे, ज्ञानेश्वर गाडेकर, घ्रष्णेश्वर मलशेट्टे, रामकिशन शिरुरे, डिगांबर बिराजदार, आण्णाराव सोनटक्के, खुदबोद्दीन घोरवाडे, वहाब जागिरदार, माधव गंगापुरे, संभाजी सेनेचे तालुकाध्यक्ष राजू शेलार, व्यंकट रेड्डी, बळीराम जाधव ,सतिश श्रंगारे, गुंडेराव मोरकांडे, संजय श्रंगारे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात सर्व धर्मीय तरुण, युवक तसेच महिलांनी उदंड प्रतिसाद देत ३६१ जनांनी रक्तदान केले. गेल्या २१ वर्षांपासून सातत्याने हे आयोजन केले जाते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अनिल चव्हाण यांनी स्वतःचे ५५ वे रक्तदान केले. तसेच संभाजी कोरे व बाळू कोरे या दिव्यांग युवकांनी रक्तदान केले. शिबिरात भिमज्वाला ग्रुप, फय्याज भांडी स्टोअर्स, जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब, जीप चालक मालक संघटना, बुलढाणा अर्बन क्रिडेट सोसायटी यांनी सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी कैलास चव्हाण, सत्यवान सावंत, पप्पु सावंत, बाळासाहेब बरचे, संतोष तेलंगे, धोंडीराम स्वामी, अमोल सोमवंशी, कैलास सूर्यवंशी, पिंटू फरकांडे, संजय सावंत, हाणमंत डोरले, दत्ता शिंदाळकर, भद्रीनाथ सोनटक्के, प्रशांत फरकांडे, बळी शिंदे, शुभम अष्टेकर, बालाजी पेन्सलवार, विजय ढोबळे, अमोल पांचाळ, दीपक जाधव, शाम सावंत, दीपक शिरुरे, डॉक्टर बालाजी पांचाळ, अनिल पांचाळ, भिवाजी गव्हाणे, नागनाथ बिराजदार सत्यवान जाधव आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद हुडगे, शैलेश रेड्डी यांनी केले.        

Post a Comment

0 Comments