मुस्लिम आरक्षण परिषदेचे शरद पवारांना आमंत्रण
लातुर:( जिल्हा प्रतिनिधी/बी जी शेख ) मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसह मुस्लिम समाजाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने लातूरमध्ये 'मुस्लिम आरक्षण परिषदे'चे आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मुंबई येथे राष्ट्रवादी सुप्रीमो मा.शरद पवार यांची भेट घेण्यात आली,यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष अजीज पठाण, सरचिटणीस मोहसीन खान, उपाध्यक्ष जब्बार काझी, शेख उस्मान, अॅड शेख शफी, कादर खान,अजीम तंबोली यांची उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम समाजाची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक आदि क्षेत्रात पिछेहाट होत आहे. त्यामुळे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, मुस्लिम समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नती व्हावी यासाठी राजकीय प्रयत्नाची आवश्यकता आहे. त्यामुळे पुरोगामी विचारसरणीचा चेहरा मानल्या जाणार्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना ' मुस्लिम आरक्षण परिषदेचे' आमंत्रण देण्यात आल्याचे मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेश सरचिटणीस मोहसीन खान यांनी सांगितले.

0 Comments