घोषणा कशाला ? हे बघा कामच !
भादा: गावातील मुख्य चौकाजवळील बारवाला सुरक्षा कढडे बसवा अशी मागणी गावातील तरुण सचिन मुकडे सह गेल्या काही दिवसात अनेकांनी केली होती. या मागणीची दखल तात्काळ उपसरपंच बालाजी शिंदे यांनी घेतली असुन नुस्ती घोषणा कशाला हे बघा कामच म्हणत आज प्रत्यक्षात बारवच्या कामाला सुरूवात केली. विशेष म्हणजे या बाबत वेळोवेळी इशारा न्युज ने वृत्त प्रकाशीत केले होते. गावातील तरुणांच्या मागणीची आम्ही तात्काळ दखल घेतली असुन बारवला सुरक्षा कोठड्या सहीत जाळी हि बसवली जाणार असल्याची माहीती उपसरपंच बालाजी शिंदे यांनी दिली.

0 Comments