Latest News

6/recent/ticker-posts

जनजागृती कार्यक्रमाने भादेकर मंत्रमुग्ध कोविड लसीकरण जनजागृती मोहीम

जनजागृती कार्यक्रमाने भादेकर मंत्रमुग्ध कोविड लसीकरण जनजागृती मोहीम


बी डी उबाळे

औसा: महाराष्ट्र शासन आणि माहिती व  जनसंपर्क  संचालनालय शाखा लातूर कार्यालयांतर्गत covid-19 च्या लसीकरण निमित्त जनजागृती कार्यक्रम औसा तालुक्यातील भादा येथे शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता कोविडंची लस सुरक्षित असून प्रत्येकाने हि लस घेऊन लसीकरण करून घ्यावे आणि मास्कचा वापर सतत करावा आणि मास्कचा वापर करून आपले जीवन सुरक्षित करून घ्यावे अशी मुद्देसूद नाट्यमय सादरीकरण मुक्ताई सेवाभावी संस्था लातूर आणि जिल्हा माहिती व जनसंपर्क कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे पथनाट्य सादर करण्यात आले.या कलाकार टीमने मोठया जिद्दीने आणि चांगल्या पद्धतीने हे पथनाट्य आणि जनजागृती केली ज्यामुळे सादरीकरण प्रभावी ठरले याकरीता अबाल वृद्ध नागरीक मोठ्या संख्येने संपूर्ण कार्यक्रम सादर होईपर्यंत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments