चाकूर-अलगरवाडी येथे मिशन बाला अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न
चाकूर:( ता.प्र.सलीमभाई तांबोळी ) चाकूर येथील अलगरवाडी येथे मिशन बाला अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी शिक्षक हेच सामर्थ्यवान असून, समाजामध्ये शिक्षका मुळेच मोठा बदल होतो असे या ठिकाणी भगवान फुलारी यांनी त्यांचे विचार व्यक्त केले.
.चाकूर तालुक्यातील प्रगतीपथावर असलेल्या अलगरवाडी येथील जिल्हा परिषद ही शाळा मिशन बाला उपक्रमाअंतर्गत डेमो म्हणून ही शाळा तयार झाली पाहिजे असे मागील काही दिवसापूर्वी शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनीच विचार व्यक्त केले होते अगदी त्याप्रमाणेच ही शाळा तयार झालेली आहे. या शाळेमध्ये मिशन बाला उपक्रमाअंतर्गत तालुकास्तरीय आज गुरुवार रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी लातूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी सर्वप्रथम या शाळेमध्ये मिशनबाला अंतर्गत जे काही काम सरपंच गोविंद माकणे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे त्यांचे मनस्वी कौतुक केले व समाजामध्ये शिक्षकामुळेच मोठा बदल होतो. तो बदल म्हणजे शांतीसेनेने सुद्धा होणारा बदल नव्हे व तो होणेही शक्य नाही. शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी असे सांगितले की एखाद्या हॉस्पिटलच्या एका कोपऱ्यामध्ये एका बाळाची आई डॉक्टरांना विनंती करते की डॉक्टर त्याला वाचवा, अगदी त्याच प्रमाणे मी येथील सर्व शिक्षकांना विनंती करतो की तुम्ही शिकवा, त्याप्रमाणेच बाला उपक्रम म्हणजे उत्क्रांती होय व निरीक्षण करणे म्हणजे बाला उपक्रम होय, बाला उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांची नजर जाईल तिकडे काही तरी नजरेस घेण्यासारखे दिसलेच पाहिजे म्हणजेच बाला उपक्रम होय. असे सविस्तर मार्गदर्शन करून शिक्षकांना त्यांच्या कामाविषयी शिक्षणाधिकारी फुलारी यांनी हमी दिली की तुमचे कुठलेही काम प्रलंबित राहणार नाही. याची खबरदारी मी घेतो व तुम्ही शिकवण्याची जबाबदारी घ्या असाच सुचक कानमंत्र दिले या शाळेला गावचा व सरपंच माकणे यांचा खूप मोठा वाटा असल्यामुळे या शाळेला आपल्याकडून वाचनालय व प्रयोग शाळा अशा सुविधा देण्याचे घोषितही केले. गोविंदराव माकणे यांनी शाळेचे काम करण्यासाठी निधी कमी पडत असल्याची खंत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय शिक्षण समितीचे राम पिलंगुले, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी संजय आलमले, ज्येष्ठ विस्तार अधिकारी दिलीप हैबतपुरे, विस्तार अधिकारी मधुकर ढमाले, घटकार, केंद्रप्रमुख बालाजी बावचे, बिरले ,सोनवणे, मार्गदर्शक व राणीअंकुलगा येथील मुख्याध्यापक वाघमारे, यांच्यासह सरपंच गोविंदराव माकणे, शिवहार स्वामी, माधव सोनटक्के, मुरलीधर सागावे ,माधव नागरगोजे ,प्रकाश बिरले ,रवी देशमुख, दत्तात्रेय बरदाळे, परमेश्वर स्वामी, राजकुमार स्वामी, शादुल शेख, या शाळेचे मुख्याध्यापक रायवाड,या शाळेचे शिक्षक बाळासाहेब धुपे, मद्रेवार, उम्बर्गे, बिबराळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष धीरज माकणे, उपाध्यक्ष नागनाथ पटणे ,ग्रामपंचायत सदस्य राम सांगवे, यांच्यासह संगमेश्वर पटणे, व गावातील नागरिकांची उपस्थिती होती. ही शाळा तालुक्यातील सर्व शिक्षक पहात पहात ते कौतुक ही मोठ्या प्रमाणात करत होते. ही शाळा म्हणजेच शिक्षणाची पंढरी असेच संबोधत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका चाटे, या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाळासाहेब तुपे ,तर आभार शिक्षीका बिबराळे यांनी मानले.

0 Comments