Latest News

6/recent/ticker-posts

औसा बस स्थानकाचे काम रखडले; चर्चा सुरु

औसा बस स्थानकाचे काम रखडले; चर्चा सुरु



बी. डी. उबाळे

औसा: शहरातील नवीन बस स्थानकाचे काम मागील कांही दिवसापासून थंडावले असून बस डेपो समोरील जागेत नवीन बस स्थानकाचे कॉलम लेव्हल पर्यंत काम झाले आहे. रखडलेल्या कामाला गती मिळणे आवश्यक असल्याची चर्चा आहे.

 औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मतदार संघातील औसा, लामजना आणि कासारशिरसी बस स्थानकाची नव्याने उभारणी करण्याचा दिलेला शब्द पाळत तिन्ही बस स्थानकाच्या बांधकामाचा शुभारंभ केला आहे. परंतु औसा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या भव्य बस स्थानकाचे काम कांही दिवसापासून रखडल्याने जनतेत चर्चेचा विषय झाला आहे. 

सोलापूर, विजापूर, कोल्हापूर, हैदराबाद, गुलबर्गा आदी मोठ्या शहराकडून धावणार्‍या लांब पल्ल्याच्या अनेक बसेस शहरात न येता औसा टी-पॉईंट पासूनच जातात.50 हजार लोकसंख्येचे शहर असून तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज बस स्थानक आणि इतर सुविधांचा अभाव असल्यामुळे लांब पल्ल्याच्या बसेस शहरात न येता बाहेरुनच धावत असल्याने शहरातील एसटी प्रवाशांची गैरसोय होत आहे. या कामी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी संबंधित कंत्राटदार एजन्सीला संपर्क करून निधीची उपलब्धता करून औसा बससनकाच्या बांधकामासाठी पाठपुरावा करावा व तातडीने हे बांधकाम सुरू करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले पाहिजे अशी जनतेची चर्चा सुरू आहे. औसा हे तालुक्याचे ठिकाण असून शहरात सर्व सुविधांनी युक्त सुसज्ज बस स्थानक तातडीने उभारण्याची गरज आहे. आगारप्रमुख यांनीही या कामी पाठपुरावा करण्याची गरज आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आटोक्‍यात येत असून आता राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात सुसज्ज बसस्थानकाची उभारणी लवकर व्हावी ही प्रवासी जनतेची मागणी आणि अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments