Latest News

6/recent/ticker-posts

समदर्गा सरपंचपदी काळे तर उपसरपंचपदी ढोक

समदर्गा सरपंचपदी काळे तर उपसरपंचपदी ढोक


बी. डी. उबाळे

औसा: तालुक्यातील मौजे समदर्गा येथील ग्रामपंचायत सरपंचपदी देवकन्या उद्धव काळे तर उपसरपंचपदी महादेव गोरोबा ढोक यांची निवड करण्यात आली. 

बुधवार दि 19 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत निवड करण्यात आली.

9 सदस्य संख्या असलेल्या समदर्गा ग्रामपंचायत मधील खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.या विशेष सभेत उद्धव काळे यांची सरपंच पदी तर महादेव गोरोबा यांची उपसरपंच पदी सर्वानुमते निवड झाली.


यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य उध्दव काळे, हेमांद्रीपंत काळे,सुमित कसबे,आशा यादव, मीराबाई ढोक,रंजना तिडके,नंदाबाई तिडके, तसेच पोलिस पाटील संजय कुलकर्णी,संजय ढोक, सुग्रीव तिडके, विठ्ठल ढोक,बालाजी तिडके, ज्ञानोबा सुरवसे, बब्रुवान तिडके, राजेंद्र शिंदे आदींनी सहकार्य व जल्लोष करून स्वागत केले.या निवडी साठी अध्यासी अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी बालाजी तेलंग, ग्राम सेवक महेश थळकरी, तलाठी भागवत कोळी यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments