Latest News

6/recent/ticker-posts

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे हस्ते दिव्यांगाना साहित्य वाटप

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे हस्ते दिव्यांगाना साहित्य वाटप


कासार बालकुंदा: (प्रतिनिधी/मारुती लोहार) निलंगा तालुक्यातील  कासार बालकुंदा जिल्हा परिषद.गटातील 16 गावामध्ये दिव्यांग लाभार्थी व्यक्तीना साहित्य वाटप करण्यात येणार असून त्यातील  कासार बालकुंदा जिल्हा परिषद गटातील  मिरगाळी हल्लाळी ममदापूर चिलवंतवाडी येथे साहित्य वाटप करण्यात आला आहे. मिरगाळी  येथील तेरा दिव्यांग व्यक्तीना चार्जींग सायकल,कृञीम पाय,श्रवण यंञ,व्हील चेअर,काठ्या दोन,तीन सायकल,हेल्मेट असे साहित्य मिरगाळी येथील दिव्यांग व्यक्तीना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे व नितीन पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ओम बिराजदार ,सुरेश बिराजदार,सरपंच बंडाप्पा विश्‍वनाथ फुलारी,उपसरपंच संदीप औरादे.ग्रामसेवक के के हनुमंते, पोलीस पाटील शिवाजी पाटील अादी उपस्थित होते.


कासार बालकुंदा गटातील 16 गावातील ममदापूर माळेगाव कल्याणी ताडमुगळी वाक्सा टाकळी तांबाळवाडी मिरगाळी हल्लाळी  पिरुपटेल वाडी कासार बालकुंदा  चिलवंत वाडी उस्तुरी  हरिजवळगा अादी गावातील दिव्यांग व्यक्तीने साहित्य वाटप लवकरच करण्यात येणार आहे अशी माहिती मिलींद लातुरे व नितीन पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments