Latest News

6/recent/ticker-posts

औसा विधिज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीधर जाधव तर उपाध्यक्षपदी मुजीब शेख

औसा विधिज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीधर जाधव तर उपाध्यक्षपदी मुजीब शेख


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी.जी.शेख) दि.११ - औसा येथील विधिज्ञमंडळाची वार्षिक निवडणूक दिनांक ८ फेब्रुवारी रोजी झाली या निवडणुकीत श्रीधर जाधव अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी मुजीब शेख निवडून आले. एकूण 123 मतदार पात्र होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅडवोकेट बी एस कारंजे यांनी काम पाहिले. या निवडणुकीत सचिव संतोष माडजे, सहसचिव अजिंक्य फत्तेपुरकर, कोषाध्यक्ष शालिवान शिंदे विजय झाले. या निवडीचे अरविंद कुलकर्णी, मुक्तेश्वर वागदरे शहानवाज पटेल, पंडित कोहळे,खैसर इनामदार, प्रकाश काळदाते, सुधाकर खेडमनोरकर, लिंबराज कांबळे, संतोष बिराजदार,आदी वकिल मंडळींनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments