उस्तुरीच्या सरपंचपदी मल्लिकार्जुन दानाई तर उपसरपंचपदी सुवर्णा गुंजोटे यांची बिनविरोध निवड
कासार बालकुंदा:{प्रतिनिधी मारुती लोहार} निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा जिल्हा परिषद गटातील उस्तुरी ग्रामपंचायतीवर ती भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व कायम राहिले आहे. मल्लिकार्जुन दानाई यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे.
गेल्या वेळेस पाच वर्ष उपसरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले. गावच्या विकासासाठी स्वतः हिमतीने भाग घेऊन आमदार ,खासदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद, फंडातून निधी आणून गावचा विकास साधला गेला. गावातील रस्ते, नाले, लाईट सर्व सुविधा गेली पाच वर्षांमध्ये उपलब्ध करून दिल्याने गावकऱ्यांनी पुन्हा विश्वासात घेत भारतीय जनता पार्टीला विजय केल्याने आज विकासाच्या जोरावर मल्लिकार्जुन दानाई त्यांना उपसरपंच पदावरून सरपंच झाले आहेत.
या निवडीबद्दल लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद लातूरे, नितीन पाटील, पत्रकार सिद्धेश्वर जावळे, दयानंद मठपती, सभापती राधाताई बिराजदार, सुरेश बिराजदार, यांच्यासह गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

0 Comments