Latest News

6/recent/ticker-posts

विद्युत पोलवरून पडल्याने लाईनमनचा मृत्यू

विद्युत पोलवरून पडल्याने लाईनमनचा मृत्यू 


औसा:(तालुका प्रतिनिधी/बी डी उबाळे) तालुक्यातील आलमला येथील कार्यरत महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण आदिनाथ क्षीरसागर वय ४० वर्षे  हे मंगळवार दि १ फेब्रुवारी २०२१ सकाळी ९ वाजता आलमला येथे  लाईन दुरुस्ती करण्यासाठी लाईन परमिट घेऊन वीज बंद करून पोलवर चढले असता अचानक खाली पडले. त्यांना प्रत्यक्षदर्शी लोकांनी उचलून तात्काळ लातूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले. 

औसा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले.

त्याच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी खरोसा येथे दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यात पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

अत्यंत सुस्वभावी व चांगले काम करणारा एक कर्मचाऱ्याचे अचानक दुर्दैवी निधन झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments