Latest News

6/recent/ticker-posts

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल एकास अटक;चाकुर पोलिसांची कारवाई

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल एकास अटक;चाकुर पोलिसांची कारवाई

आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा खरा आरोपी गजाआड

बिलाल पठाण यांना या प्रकरणा संदर्भात संपर्क केला असता.मला नाहक जेल मध्ये जावे लागले माझी समाजामध्ये बदनामी झाली.कुटुंबियांना मानसिक धक्का बसला.पण पोलीस प्रशासनांने तरी खर्या आरोपीला अटक करावी आशी प्रतिक्रिया बिलाल पठाण यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना दिली.

चाकूर:( तालुका प्रतिनिधी/सलीमभाई तांबोळी ) शहरात एक वर्षभरापूर्वी लिंगायत समाजाच्या विरोधात बिलाल पठाण यांच्या फेसबुक अकाउंट वरून आक्षेपार्ह मजकूर टाकल्याची घटना घडली होती. परंतु बिलाल पठाण यांच्या फेसबुक अकाऊंटवरून सदरील पोस्ट पडल्याने बिलाल पठाण यांच्याविरुद्ध तेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु त्यावेळी बिलाल पठाण यांनी सदरील मजकूर आपले फेसबुक अकाउंट कोणी तरी हॅक करून सदरील पोस्ट टाकली  असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. त्यावरून  चाकुर पोलीस व सायबर सेल लातूर यांनी या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता सदरील पोस्ट बिलाल पठाण यांच्या मोबाईल वरून टाकली गेली नसून अहमदपूरच्या एका सायबर कॅफे मधील कॅम्पुटर वरून टाकली असल्याचे निष्पन्न झाले. त्या चौकशी मधुन या प्रकरणाचा अधिक छडा लावत या प्रकरणातील खरा आरोपी हकानी शेख यास चाकूर  पोलिसांनी परवा गजाआड केले आहे. त्यास  एक दिवसाची पोलिस कोठडी घेण्यात आली असून अधिकची चौकशी सुरू आहे. 

 सदरील प्रकरणातील  पडद्यामागच्या सूत्रधारास अटक होणार का ?

 चाकुर  पोलिसांनी या प्रकरणातील खरा आरोपी हाकानी शेख यास अटक केली तरीही या प्रकरणातील पडद्यामागचा सुत्रधार अद्यापही  बाहेरच आहे. त्याचा चाकूर पोलीस शोध लावून त्यास गजाआड करणार का ? याबाबत जनतेत उलटसुलट चर्चा चालू आहे ? याप्रकरणी अखेर एक वर्षानंतर हाकानी शेख याला चाकुर पोलिसांनी अटक केली. त्याच न्यायलयात हजर केले असता. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनवली. त्यांने याबाबतचीकबुली दिली आहे असे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट म्हणाले.

Post a Comment

0 Comments