Latest News

6/recent/ticker-posts

उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण

उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा येथील उपजिल्हा रुग्णलयातील कंत्राटी तत्त्वावरील स्वच्छता कर्मचारी सन-2018 पासून कार्यरत असून प्रत्येकी मासिक मानधन 3,000 रुपये आहे. एक तर तटपुंज्या वेतनावर काम करत असताना सुद्धा माहे मार्च 2020 पासून आजपर्यंत संबंधीत ठेकेदारापासून  उपजिल्हा रुग्णलयातील कंत्राटी तत्त्वावरील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन आणखी मिळत नाही व वेतन वाढ पण नाही त्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोविड-19 सारख्या महामारीमूळे अख्य जग संकटात असताना त्या संकटाच्या काळात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अखंडीत सेवा  देऊन त्यांचे वेतन 10 महिण्यापासून थकले असल्यामुळे निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी स्वच्छता कर्मचारी उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर बेमुदत आमरण  उपोषणाला बसले आहेत या उपोषणाला अजय कांबळे, पद्मिन उकळ, अलका कांबळे , असिफ शेख, हवसाबाई कांबळे, लक्ष्मीबाई कांबळे, गंगू धैर्य, निकीला सावळे, गंगुबाई गायकवाड, कमळाबाई, जयश्री ई. स्वच्छता कर्मचारी उपस्थित आहेत.

Post a Comment

0 Comments