निलंगा येथे संत श्री सेवालाल महाराज 282 वी जयंती सोहळा
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) येथील कॉम्प्युटर अकॅडमी तर्फे बंजारा समाजाचे संत श्री सेवालाल महाराज यांची 282 जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विठ्ठल राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल चांभारगे हे होते.बालाजी राठोड, काशिनाथ राठोड, चंद्रशेखर चव्हाण, राजेश जाधव, रवींद्र चव्हाण, भीमराव चव्हाण, यांनी एकत्र येत संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ ज्योती राम राठोड यांनी केले. यावेळी सौ शीला राठोड, ज्योती वडते, वनिता जाधव, पर्याग वडते, ज्योती राठोड सह अनेक जण उपस्थित होते.

0 Comments