Latest News

6/recent/ticker-posts

केळगाव येथे संत सेवालाल महाराज यांची 282 वी जयंती बंजारा समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी

केळगाव येथे संत सेवालाल महाराज यांची 282 वी जयंती बंजारा समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी


केळगाव:{ प्रतिनिधी/वसीम मुजावर } निलंगा तालुक्यातील केळगाव येथे बंजारा संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी गावचे सरपंच उपसरपंच यांची उपस्थिती होती बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांची 282 वी जयंती आज केळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .त्यावेळी केळगाव तांडा वसंत नगर येथील बंजारा समाजाच्या युवकांनी गावातून भव्य अशी मोटरसायकल रॅली काढली व केळगाव पाटीवर संत सेवालाल महाराज व महाराष्ट्राचे माजी स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यावेळी केळगाव नगरीचे सरपंच के एस कांबळे उपसरपंच सुधाकर चव्हाण, कोंडीराम जाधव, वसंत राठोड, आकाश राठोड ,बालाजी राठोड, रंगराव पाटील, उद्धव राठोड, सह बंजारा समाजातील महिला आपल्या पारंपारिक वेशभूषा मध्ये जयंतीत सहभागी होत्या. सेवालाल महाराज की जय च्या घोषणांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

Post a Comment

0 Comments