Latest News

6/recent/ticker-posts

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर नूतन जिल्हा कार्यकारणी निवड

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर नूतन जिल्हा कार्यकारणी निवड


आयु बालाजी उबाळे यांची संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली

लातूर:{ जिल्हा प्रतिनिधी बी जी शेख } -रविवार दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रोजी लिम्बुनी बुध्द विहार बौद्धनगर, आंबेडकर चौक लातूर येथे दुपारी 2:30 वाजता जिल्हा नूतन कार्यकारणीची बैठक घेण्यात आली.

भारतीय बौद्ध महासभा                                                रजि. न.:-3237/1955 F-982(BOM)1962

 संस्थापक अध्यक्ष:- बोधीसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय अध्यक्ष:- आदरणीय आयुं. राजरत्नजी आशोकराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हीं कार्यकारिणी महाराष्ट्र संघटक दिनेशजी हणमंते यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी प्रमुख पाहुणे  मार्गदर्शक आयु.दिनेशजी हणमंते सर महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक हे उपस्थित होते. या बैठकीचे अध्यक्ष म्हणुन आयु.कुमारभाऊ सोनकांबळे जिल्हा प्रभारी यांची एकमताने लातूर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 

सर्व प्रथम तथागत महाकारूणी भगवान बुध्द आणि बोधिसत्व परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करण्यात आले.तसेच माता भिमाई रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करन त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.माता भिमाई यांची जंयती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक आयु दिनेश हणमंते यांचे स्वागत बैठकीचे अध्यक्ष आयु कुमार भाऊ सोनकांबळे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा उपाध्यक्ष आयु विजय कांबळे व  मराठवाडा सचिव आयु. प्रा किशोर चक्रे  उपस्थित होते. यांची मराठवाडा विभागावर निवड झाल्याबद्दल जिल्हा कमिटीच्या वतीने सत्कार व स्वागत करण्यात आले.या बैठकीस उपस्थित सर्व सदस्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.प्रास्ताविक आयु.कुमारभाऊ सोनकांबळे यांनी केले. आतिशय मार्मिक व मुद्दे सुद्द मार्गदर्शन आयु दिनेशजी हणमंते सर यांनी केले व नूतन कार्यकारणीस मान्यता दिली.

 नूतन कार्यकारणी खालील प्रमाणे

1) आयु कुमार भाऊ सोनकांबळे -जिल्हा अध्यक्ष लातूर जिल्हा

2) आयु. दिपक सुर्यवंशी -जिल्हा उपाध्यक्ष

3) आयु. महादेव वाघमारे- जिल्हा उपाध्यक्ष

4) आयु.रविकांत सिरसाट - मुख्य सचिव

5) आयु. विजय मस्के -सचिव

6) आयु . भगवान इसाळे- सचिव

7) आयु. सतिश मस्के- कोषाध्यक्ष

8) राजीव कांबळे- मुख्य संघटक

9) आयु.म.माया ताई सोरटे -संघटक

10) आयु बालाजी उबाळे- संपर्क प्रमुख

11) आयु सुरेंद्र कांबळे- संस्कार प्रमुख

12) निवृत्ती सुर्यवंशी- पर्यटन प्रमुख

13) शरद सोनकांबळे -विभागीय प्रभारी अहमदपुर

14) रमेश धर्माधिकारी- विभागीय प्रभारी जळकोट

वरील सर्व सन्मानीय   पदाधिकाऱ्याचा महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक आयु.दिनेश जी हणमंते सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. आयु सचिनजी रणखांबे सर मराठवाडा अध्यक्ष यांनी फोन संदेशद्वारे नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.संरणत्तय ने बैठक संपन्न झाली. सुत्रसंचालन आयु. रविकांत सिरसाट यांनी केले. यावेळी आयु. कमलाकर इंगळे लातूर शहर प्रभारी, आयु.विक्रम गायकवाड  देवणी, आयु.शिंदे  देवणी, महेश काळे  देवणी तालुका प्रभारी, कांबळे सिद्धार्थ तालुका रेणापूर , आयु  अरविंद दामावले प्रसिद्धी प्रमुख, आयु दत्ता लोखंडे, आयु.विनोद साखरे, आयु विशाल कांबळे इत्यादी सन्मानिय सदस्य उपस्थित होते.शेवटी आभार आयु. रविकांत सिरसाट यांनी मानले.

Post a Comment

0 Comments