कासार बालकुंदा येथे दारू विक्रेत्यावर पोलिसाकडून कारवाई
कासार बालकुंदा:{ प्रतिनिधी मारुती लोहार} निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे अवैद्य दारू विक्री मटका जोमात सुरू असल्याचे माहिती पोलीस अधीक्षक यांना कळताच त्यांनी पोलिस यंत्रणा सज्ज करून कासार बालकुंदा गावातील अवैध दारु विक्री करणारे वरती कारवाई केली आहे. चार दिवसापूर्वी जिल्ह्याचे पथक घेऊन पाहणी केली होती. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. दवाखाना शाळा तसेच रस्त्याच्या कडेला दारूचे अड्डे असल्याने महिलांना दवाखान्यासाठी जात असताना तळीरामांचा त्रास सहन करावा लागत होता. कासार शिरशी पोलीस यांच्याकडून चार दिवसात 4 अवैद्य दारू विक्री करणाऱ्या दुकानावरती कार्यवाही करण्यात आली आहे. निळकंठ सिद्राम किल्ले, गणेश अशोक कावले, बबन बुग्गे, सूर्यकांत धोंडीबा चौधरी या चौघांवर कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती पोलीस नाईक मन्मथ धुमाळ यांनी दिली आहे. गावामध्ये आणखी अवैध दारू विक्रेते आहेत त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. कासार शिरशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवणनाथ डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मन्मथ धुमाळ व पोलीस नाईक शिरसाट यांनी कारवाई केली आहे.

0 Comments