नळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; गेल्या वीस वर्षांची अखंड परंपरा
नळेगाव:( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने गेल्या 20 वर्षापासून सातत्याने आयोजित करण्यात येत असलेले रक्तदान शिबिर यंदाही दि. 19 फेब्रुवारी 2021 वार शुक्रवार रोजी सकाळी ठीक 09.00 वा. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर श्री अष्टविनायक मेडिकल अँड जनरल स्टोअर्सच्या समोर, येरोळकर कॉम्पलेक्स, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नळेगाव. येथे आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा प्रत्येकी 2.50 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात जोखीम विमा पॉलीसी काढण्यात येणार आहे. विमा प्रतिनिधी- दिपक शिरूरे(युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड)
1) बुलढाणा अर्बन क्रेडीट सोसायटी,नळेगाव
2) जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब,नळेगाव
3) जीप चालक मालक संघटना,नळेगाव यांच्या सौजन्याने विमा पॉलिसी काढण्यात येणार आहे. तरी ईच्छुक रक्तदात्यांनी आपल्या नावाची नोंदणी
1) श्री अष्टविनायक मेडिकल मेन रोड, नळेगाव
2) हॉटेल वसुंधरा &रेस्टॉरंट नळेगाव कॉर्नर, नळेगाव
3) सरस्वती भांडी स्टोअर्स,मेन रोड नळेगाव
येथे करावी व रक्तदान करून खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करावी. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आधार कार्डाची झेरॉक्स प्रत सोबत आणावीत,रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्राचे वितरण तात्काळ शिबिरात वाटप करण्यात येणार आहे. असे आवाहन मुख्य आयोजक "शिवजयंती महोत्सव समिती, नळेगाव" व युवा नेते अनिल भैय्या चव्हाण व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती करिता खाली दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 9422371717, 9423270000

0 Comments