काँग्रेस नेते अशोकराव पाटील निलंगेकर व निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश रेशमे यांनी दिली मुजावर कुटुंबाच्या नवदाम्पत्यास भेट ;माजी सरपंच शकील पांढरेंनी केले सत्कार
केळगाव:- निलंगा तालुक्यातील केळगाव येथील शिवसेनेचे कार्यकर्ते हुजूर मुजावर यांच्या मुलीच्या लग्नात आज काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर व शिवसेनेचे निलंगा तालुका प्रमुख अविनाश रेशमे यांनी भेट देऊन नवदांपत्यास लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.
आज केळगाव येथे हुजूर मुजावर या शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नामध्ये महायुतीचे कार्यकर्ते तथा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर व शिवसेनेचे निलंगा तालुका प्रमुख अविनाश रेशमे यांनी भेट देऊन नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या त्यावेळी मुजावर परिवाराच्या वतीने माजी सरपंच शकील पांढरे यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले त्यावेळी केळगाव चे नूतन सरपंच व सुभाष कांबळे उपसरपंच सुधाकर चव्हाण,चेअरमन शिवाजी चव्हाण ,ग्राम पंचायत सदस्य भम्पू चव्हाण ,सूर्यकांत सूर्यवंशी ,प्रकाश सूर्यवंशी ,सिराज देशमुख, यांची उपस्थिती होती या सर्व महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुजावर परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आले व आलेल्या सर्व मान्यवरांनी नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या.


0 Comments