Latest News

6/recent/ticker-posts

दीपस्तंभ शैक्षणिक मासिकाचे प्रकाशन प्रवीण दरेकर विरोधी पक्ष नेते यांच्या हस्ते चाकूर येथे संपन्न

 दीपस्तंभ शैक्षणिक मासिकाचे प्रकाशन प्रवीण दरेकर विरोधी पक्ष नेते यांच्या हस्ते चाकूर येथे संपन्न


चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} चाकूर शहरातील सोसायटी चौक येथे संपन्न झालेल्या गुरूगौरव पुरस्कार समारंभामध्ये दीपस्तंभ या नववर्ष शैक्षणिक विशेषांकाचे प्रकाशन विधान परिषद विरोधी पक्ष नेते माननीय प्रवीण दरेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय ओन्ली ॲक्टिव शिक्षिका समूह याचे मुख्य प्रशासक सुदाम साळुंखे,तंत्रस्नेही शिक्षक संपादित दिपस्तंभ या विशेषांकाच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या

     लातूर जिल्ह्यातीलओन्ली ऍक्टिव्ह शिक्षिका समूहाच्या सदस्या तथा प्रतिनिधी म्हणून श्रीमती वर्षा सांगवीकर,सशी BKD माध्यमिक  विद्यालय चाकूर  आणि दीपस्तंभ शैक्षणिक नववर्ष विशेषांकाचे सहसंपादक श्री धनराज सूर्यवंशी,विषयसाधनव्यक्ती गट साधन केंद्र चाकूर हे मंचावर उपस्थित होते. विशेषांकतील नवोदित लेखक, कवी यांचे लेखनाचे  कौतुक करून उपक्रमशील शिक्षकांना लिहिते व्हा असा सल्ला  बाबासाहेब पाटील यांनी अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन दिले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

        यावेळी मंचावर आमदार बाबासाहेब पाटील, आमदार रमेश आप्पा कराड,  आमदार अभिमन्यु पवार, माजी मंत्री संभाजी पाटील , माजी आमदार बब्रुवान खंदाडे ,माजी आमदार विनायकराव पाटील ,मा गणेशदादा हाके, राहुल केंद्रे जिल्हा परिषद अध्यक्ष लातूर, जमुनाताई बडे सभापती पंचायत समिती चाकुर, सज्जनजी लोणावळे उपसभापती पंचायत समिती चाकुर,  रोहिदास वाघमारे समाज कल्याण सभापती जि प लातूर , संजयजी दोरवे माजी समाजकल्याण सभापती लातूर , हर्षवर्धन कसबे जि प सदस्य,  धनश्रीताई अर्जूने जि.प. सदस्य, रूपालीताई पवार नगराध्यक्ष नगरपंचायत चाकूर, नितीन रेड्डी उपनगराध्यक्ष चाकूर , तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे चाकूर तालुक्यातील सर्व जि प सदस्य व पंचायत समिती सदस्य आदीं मंचावर उपस्थित होते.

 या अंकाच्या प्रकाशनाबद्दल  गोकणवार गटविकास अधिकारी,  संजय अलमले, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चाकुर , यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून प्रोत्साहन दिले व अभिनंदन केले आहे.पुढील माहे एप्रिल मध्ये प्रकाशित होणाऱ्या अंकास शुभेच्छा दिल्या..

Post a Comment

0 Comments