केळगाव ग्रामपंचायत सरपंच पदी कोंडाबाई कांबळे तर उपसरपंच पदी सुधाकर चव्हाण यांची निवड
केळगाव:{ प्रतिनिधी वसीम मुजावर } निलंगा तालुक्यातील केळगाव येथे ग्रामपंचायत सरपंच निवड कार्यक्रम संपन्न. झाला त्यावेळी बिनविरोध सरपंच पदी कोंडाबाई सुभाष कांबळे तर उपसरपंच पदी सुधाकर वैजनाथ चव्हाण यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी ढाकणे व तलाठी चव्हाण व ग्रामसेवक मुक्तापुरे यांच्या उपस्थितीत ही निवड पार पडली सरपंच पदाचा दावा सिद्ध करण्यासाठी बारापर्यंत ची वेळ देण्यात आली होती परंतु त्या वेळी मध्ये एकाही उमेदवाराचा अर्ज आल्याने भाजप पॅनलचे सरपंच पदाचे दावेदार कोंडाबाई सुभाष कांबळे यांची सरपंच पदी तर उपसरपंच पदी सुधाकर वैजनाथ चव्हाण बिनविरोध निवड करण्यात आली.सदस्य म्हणून वैभव पाटील, दीपक पाटील ,अहिल्या राठोड, शितल काळे ,रुक्मिणीबाई काळे, ज्योती चव्हाण, शाहीन पांढरे,रंजना सूर्यवंशी, सूर्यकांत सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली
अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा विजय मिळवून आपली सत्ता निर्माण केली आहे तरी 3 अपक्ष उमेदवार यांच्या सदस्य म्हणून निवड झाली असून एकूण अकरा उमेदवारांनी आज ग्रामपंचायत पदाचा कार्यभार स्वीकारला
त्यावेळी विजयकुमार पाटील, वीरेंद्र पाटील,बाबा भाई शेख, जगन सूर्यवंशी ,एकनाथ काळे, शिवाजी राठोड ,सुभाष कांबळे, निलंगा पंचायत समिती सदस्य हरिभाऊ काळे, माधव चव्हाण ,प्रकाश चव्हाण, जिलानी देशमुख, लहू कांबळे, उत्तम सूर्यवंशी ,अजित काळे ,पिंटू पाटील, भम्पू चव्हाण, अंकुश काळे ,धनराज काळे रावसाहेब चव्हाण ,अनंत कांबळे, दशरथ कांबळे, शिवाजी कांबळे, सह ग्रामस्थांची उपस्थिती होती त्यावेळी पोलीस प्रशासनाने हे सुद्धा उपस्थित होते

0 Comments