लातूर जिल्ह्यात ९८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले;शनिवार, दि. २७ व रविवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी जनता कर्फ्यू
के वाय पटवेकर
जिल्ह्यात शनिवार, दि. २७ व रविवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी जनतेने स्वतःहून जनता कर्फ्यू पाळवा व विनाकारण घरावर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
लातूर: दि.२४ - लातूर जिल्ह्यात ९८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर उपचारादरम्यान आज एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५०४५ वर पोहचली आहे. लातूर जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३९७ आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत ७०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या २३९४५ आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४८ आहे.


0 Comments