होईल कसा कधी अपघात ? आता नाही राहणार धाक धुक;गावची बारवं बदलणार आपला लुक
लवकरच भादा ग्रामपंचायत बांधणार बारवला सुरक्षा कठडे;उपसरपंच बालाजी शिंदे यांची इशारा न्यूजला दिली माहीती
बाबुराव आगलावे
भादा: औसा तालुक्यातील भादा येथे गावच्या मुख्य चौकाजवळ एक पुरातन बारव असुन लवकरच भादेकरांना ती नव्या रुपात बघण्यास मिळणार आहे. ग्रामपंचायत अवघ्या दोन दिवसाच्या अगोदरच या बारवच्या सुरक्षा कठड्याची उंची वाढवुन काही अचानक अपघात वगैरे होउ नये म्हणुन संरक्षक जाळी ही मारणार असल्याची माहीती उपसरपंच बालाजी शिंदे यांनी आज दिली. विशेष म्हणजे या पुरातन बारच्या कडेचे काटेरी झाडे झुडपे हि मागच्या काही वर्षाच्या काळात काढुन याच्यातील गाळ ही उपसरपंच बालाजी शिंदे यांच्या पुढाकारातुनच काढण्यात आला होता. त्यानंतर मागच्या काही दिवसा पासुन सचिन मुकडे व गावातील अन्य काही तरुण वर्गाकडून या बारवकडे लक्ष्य देण्याची व संरक्षक कठडे उभा करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्या मागणीच्या अनुशंगाने उपसरपंच बालाजी शिंदे यांच्या पुढाकारातुन येत्या दोन दिवसातच या बारवच्या कामाला ग्रामपंचायत सुरूवात करणार असल्याची माहीती उपसरपंचांनी दिली आहे. यामुळे भादेकरांना लवकरच गावातील मुख्य चौकाजवळील बारवचे नवे रुप बघायला मिळणार आहे.

0 Comments