आगळा वेगळा शपथविधी! सरपंचाची थेट हेलिकाॅप्टरमधून 'एन्ट्री'
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील आंबी दुमाला गावात एक आगळावेगळा शपथविधी सोहळा पाहायला मिळाला आहे. सरपंचपदाची शपथ घेण्यासाठी सरपंच जालिंदर गागरे यांनी थेट हेलिकाॅप्टरमधून एन्ट्री केली.
सरपंचाचे आगमन होताच बारा बैलांच्या बैलगाडीतून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसारखाच दैदिप्यमान सोहळ्यात सरपंचाचा शपथविधी पार पडला आहे. जालिंदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. ते जरी व्यावसायानिमित्त पुण्यात राहत असले तरी त्यांची गावाशी नाळ जोडलेली आहे.गावाचा विकास करण्यासाठी त्यांनी गावची निवडणुक लढवली आणि संपूर्ण पॅनल 9 पैकी 9 जागा जिंकून ते बहुमताने विजयी झाले. योगायोगाने सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरूषाचे निघाल्याने ते संरपंच झाले आणि आज त्यांनी गावच्या विकासाची शपथ घेतली.


0 Comments