आमदार आपल्या दारी ची सुरुवात महाराष्ट्राच्या शेवटच्या गावातून- आ. अभिमन्यू पवार
आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते विविध विकास कामे व शिधापत्रिका वाटप
कासार बालकुंदा:{ प्रतिनिधी मारुती लोहार } आमदार आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या शेवटच्या गावातून व्हावी म्हणून कोराळी गावाची निवड केली. विकास हा शेवटच्या माणसापर्यंत पोहचला पाहिजे हा उद्देश ठेवून आमदार आपल्या दारी या उपक्रमातून मतदारसंघात कॅम्प ठेवून सर्व शासकीय योजना व लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले. दि.१३ फेब्रुवारी रोजी कोराळी (ता. निलंगा) येथे आयोजित विविध विकास कामांचा शुभारंभ व आमदार आपल्या दारी या उपक्रमातून नागरिकांना शिधापत्रिका वाटप या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की येणाऱ्या काळात औसा विधानसभा मतदारसंघात आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवून याव्दारे जनतेचे प्रश्न सोडविले जातील यासाठी सर्कल निहाय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका कॅम्पचे आयोजन करीत याव्दारे जनतेचे घरकुल योजना, श्रावण बाळ योजना, शिधापत्रिका यासह अन्य शासकीय योजना व त्याच्याशी निगडीत अडचणी सोडविल्या जातील या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्रातील शेवटच्या कोराळी गावातून करण्यात आले आहे. या भागाचा चौफेर विकास करायचा असून या दुष्टीने कासारसिरसीला नगरपंचायतचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील असून आपण कासारसिरसी हा वेगळा तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून मागणी केली आहेत. जेव्हा महाराष्ट्रात नवीन तालुक्याची निर्मिती होईल तेव्हा कासारसिरसी हा वेगळा तालुका होईल. मी कायम जनतेच्या सेवेत राहणारा आमदार असून येणाऱ्या काळात मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबविण्याचा आपला संकल्प असल्याचे यावेळी आ.अभिमन्यू पवार यांनी सांगितले. यावेळी कोराळी वाडी येथे सिमेंट रस्त्याचे उदघाटन कोराळी येथे सिमेंट व पेव्हर ब्लॉक रस्त्याचे उदघाटन. व महादेव मंदिर सभागृहाचे उदघाटन अशा विविध विकास कामांचे उद्घाटन आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आले.वामन वाकडे, तहसीलदार गणेश जाधव, सपोनी रेवण ढमाले, सरपंच विक्रम बिराजदार, संजय मनाळे, रवींद्र बिराजदार, ज्ञानेश्वर वाकडे, जिलानी बागवान,व्यंकट माने, रावसाहेब आकडे, करिबश्वेर पाटील, कल्पना ढबीले,कल्पना गायकवाड, धोंडीराम बिराजदार, भास्कर पाटील, धर्मराज होळकुंदे, परमेश्वर बिराजदार, लाला शेख, गोरख होळकुंदे आदीसह नागरिक व विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments