Latest News

6/recent/ticker-posts

कोरंगळा सरपंचपदी राजेश शिखरे तर ज्ञानदेव जंगाले यांची वर्णी

कोरंगळा सरपंचपदी राजेश शिखरे तर ज्ञानदेव जंगाले यांची वर्णी


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील मौजे कोरंगला येथील ग्रामपंचायत सरपंचपदी राजेश शिखरे तर उपसरपंच पदी ज्ञानदेव जंगले यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. 

बुधवार दि 11फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत सरपंच उपसरपंच यांची निवड करण्यात आली.

 सदस्य संख्या असलेल्या कोरंगला  ग्रामपंचायत मधील खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.

या विशेष सभेत राजेश शिखरे यांची सरपंच पदी तर ज्ञानदेव जंगाले यांची उपसरपंच पदी सर्वानुमते निवड झाली.

यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य रमेश वाघमारे,दत्तू जंगले,छोटीबी दरोगे,मनीषा मुदगल,दैवशाला शिखरे,संगीता वाघमारे,यांचे अभिनंदन बाबुराव शिखरे,भास्कर शिखरे,वैभव शिखरे आदींनी केले व गावांमध्ये जल्लोष करून नूतन पदाधिका-र्याचे  स्वागत केले.

सदरील या निवडी साठी अध्यासी अधिकारी म्हणून पंचायत समितीचे बिराजदार एस एच यांनी सर्व शासकीय सोपस्कर सुव्यवस्थितपणे पूर्ण केले.

Post a Comment

0 Comments