माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे यांच्यामुळे तांबाळा जि.प.शाळेस अच्छे दिन
कासार बालकुंदा:{ प्रतिनिधी मारुती लोहार } कासार बालकुंदा गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरेमुळे तांबाळा जि.प. शाळेच्या अनेक भौतिक गरजा पूर्ण झालेल्या आहे. त्यांच्याकडे जि.प.अध्यक्षपद असताना त्यांनी तांबाळ्याची शाळा दत्तक घेतली व भौतिक गरजा पूर्ण करण्याचा शब्द दिला.'बोले तैसा चाले,त्याची वंदावी पाऊले...' दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांनी सहा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी २० लाखांचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.६ खोल्यांवर Slab पडून,गिलावा पूर्ण व दारे खिडक्या बसविण्यात आल्या आहे. यावर्षी त्यांनी दोन खोल्यांवर Slab टाकण्यासाठी सात लाखाचा निधी दिला आहे. पूर्वी बांधलेल्या स्वच्छता गृहांची पडझड झाली असून ते वापरात नाहीत यामुळे माजी सरपंच सुरेशराव बिराजदार, माजी उपसरपंच शिवशरण पाटील,भा.ज.पा.तालुका उपाध्यक्ष शिवादादा व्हन्नाळे, शाळा व्यवस्थापन समिती-उपाध्यक्ष अमृत(अमर) तुमकुटे यांनी आज मिलिंदजी लातूरे यांना 'स्वच्छतागृहाचे' निवेदन दिले व त्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. मिलिंद लातूरे यांच्यामुळे जि.प.तांबाळा शाळेच्या जास्तीत जास्त भौतिक सुविधा (गरजा) पूर्ण झाल्या आहेत व होत आहेत याच दरम्यान निलंगा तालुक्याच्या विद्यमान सभापती सौ.राधाताई सुरेशराव बिराजदार यांनी एका खोलीवर Slab टाकण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे व बांधकास सुरुवातही झालीआहे. आता शाळेतील सर्वच खोल्या (नऊ) Slab च्या झाल्या आहेत/होत आहेत. कासार बालकुंदा गणाच्या पं. स. सदस्या दिपालीताई नितीनजी पाटील यांनी 'बाला उपक्रमासाठी' एक लाखाचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. मिलिंदजी लातूरे यांच्या सहकार्यामुळे जि.प.तांबाळा शाळेस 'अच्छे दिन' आले आहेत. तांबाळकरांनी लोकसहभागातून अनेक वस्तू भेट देऊन 'लोकसहभागाची' जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. लोकप्रतिनिधींनी मनावर घेतल्यास त्या गावाचा किंवा शाळेचा कसा कायापालट होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे तांबाळ्याची जिल्हा परिषद शाळा. लोकप्रतिनिधीच्या व गावक-यांच्या सहकार्यामुळे जि.प.तांबाळा शाळेला ISO मानांकन प्राप्त झाले आहे. ISO मानांकन मिळविणारी ही निलंगा तालुक्यातील पहिली व एकमेव शाळा होय.

0 Comments