Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा-लांबोटा येथील त्या दोन गावच्या लेकीची चर्चा

निलंगा-लांबोटा येथील त्या दोन गावच्या लेकीची चर्चा 


लांबोटा ग्रामपंचायत सरपंच पदी ज्योती सारगे यांची तर उपसरपंच पदी ज्योती गड्डीमे यांची निवड 

केळगाव:( प्रतिनिधी/वसीम मुजावर ) निलंगा तालुक्यातील लांबोटा येथील ग्रामपंचायतीवर दोन युवतीने आपला वर्चस्व निर्माण करून इतिहास घडविला आहे व तालुक्यात वेगळाच दबदबा निर्माण केला आहे. सरपंचपदी ज्योती भागवत सारगे तर उपसरपंच पदी ज्योती दत्ता गड्डीमे यांची निवड झाल्याने निलंगा तालुक्यात या दोन गावच्या लेकीची चर्चा रंगली आहे.

          सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील लांबोटा येथे भाजप च्या अंतर्गत वादामुळे दोन गट पडले व काँग्रेसचा एक गट अशी तिरंगी लढत झाली प्रत्येकी तीन-चार अशा जागा मिळाल्याने कोणालाही बहुमत मिळाले नाही शेवटी भाजप व काँग्रेसची युती होऊन ग्रामपंचायत ची सत्ता बनवावे लागली व सरपंच काँग्रेस पक्षाचा तर उपसरपंच भाजपचा अशी युती झाली. बंडखोर पॅनल ला घरचा रस्ता मिळाला ,सरपंच म्हणून 21 वर्षाची डी फार्मसी शिक्षण घेत असलेले तरुणी ज्योती भागवत सारगे तर उपसरपंच म्हणून बारावी शिकलेली 24 वर्षाची तरुणी ज्योती दत्ता गडीमे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे लांबोटा ग्रामपंचायत निवड चांगलीच चर्चेत आले आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्ञानेश्वर किसन गड्डीमे, सुलभा काशिनाथ गोपाळे, वसंत रामचंद्र मोरे ,अलका दिलीप बिरादार ,कविता त्र्यंबक तुरे यांची निवड झाली आहे अवघ्या 21 व 24 वर्षाच्या तरुणीने गावचे सरपंच,उपसरपंच पद. भुशवल्यामुळे या सावित्रीच्या लेकीचा इतिहास निर्माण झाला आहे व त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यावेळी व्‍यंकट पाटील, बालाजी मुगळे, नागोराव ढगे, ज्ञानोबा पाटील, विजयकुमार हंगरगे, माजी सरपंच कृष्णा गोबाडे, अमोल मोरे, बालाजी पाटील, यांनी या सरपंच लेकींना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments