निटुर व्यापारी मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी बस्वराज जमादार तर उपाध्यक्षपदी राजकुमार सोनी यांची फेरनिवड
(के वाय पटवेकर)
निटूर: येथील निटुर व्यापारी मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी बस्वराज जमादार तर उपाध्यक्षपदी राजकुमार सोनी यांची फेरनिवड व्यापारी मंडळाच्या बैठकीमधे covid-19 नियमाचे पालन करत सर्वानुमते ही निवड करण्यात आली. यामधे सचिव पदी मल्लिनाथ बुरकुले, कोषाध्यक्ष- महेश तापडिया,सहकोषाध्यक्ष- महेश मिटकरी, सहसचिव- योगेश पाटील तर सदस्यपदी इसाक गस्ते, विठ्ठल डांगे, काशिनाथ जाधव, नवनाथ सरकाळे, मनोज शिवणे, गणीभाई शेख आदींची निवड करण्यात आली. उपस्थित सर्व व्यापाऱ्यांनी नवनिर्वाचित मंडळाला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. गावामधून राज्य महामार्ग गेल्याने दोन्ही दिशेने होणारा वाढता विस्तार व त्या अनुषंगाने होणारी नवनवीन व्यावसायिके यामुळे निटुर ची बाजारपेठ ही पंचक्रोशी मध्ये नेहमीच ग्राहकांची रेलचेल असणारी बाजारपेठ आहे. त्या अनुषंगाने नवनिर्वाचित मंडळाकडून ग्राहक व व्यावसायिक यांना सकारात्मक बदलाच्या व सोई सुविधा निर्माण करण्याच्या अपेक्षा आहेत.

0 Comments