Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालय, निलंगा येथे मराठी राजभाषा गौरव दिन संपन्न

महाराष्ट्र विद्यालय, निलंगा येथे मराठी राजभाषा गौरव दिन संपन्न

 


निलंगा:( प्रतिनिधी इरफान शेख ) २७ फेब्रुवारी म्हणजेच वि.वा. शिरवाडकर अर्थात कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन संपूर्ण जगभर जागतिक मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस शाळेमध्ये उत्साहात व आनंदी वातावरणात  मातृभाषेचा गौरव करण्याच्या व कृतज्ञतेच्या भावनेतून साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पाचंगे आर. के. व कार्यक्रमाचे प्रमूख अतिथी उपमुख्याध्यापक पवार डी .डी. आणि  पर्यवेक्षिका श्रीमती देशमुख एस. डी. तसेच रोड बी.टी व जगताप एस.आर. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम शाळेतील सर्व मराठी भाषा विषय अध्यापन करणाऱ्या शिक्षकांकडून मुख्याध्यापकांना वि.वा.शिरवाडकर यांची प्रतिमा भेट दिली गेली. तद्नंतर सर्व पाहुण्यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेमध्ये मराठी या विषयाचे अध्यापन करणाऱ्या सर्व विषय शिक्षकांचे प्रमुख अतिथींच्या हस्ते पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतील कुमारी प्रतिक्षा भोयबार आणि कुमारी चोपणे ऋतुजा या दोन विद्यार्थिनींनी मराठी भाषा दिनानिमित्त सुंदर मनोगत व्यक्त केले. शाळेतील मराठी विषय शिक्षिका श्रीमती जन्मले एस. ए. यांनी माझी मराठी ही मृणाली जोशी यांची कविता सुंदर पद्धतीने गायिली तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती देशमुख मॅडम यांनी  हा देश माझा ही वसंत बापट यांची कविता याचे सुंदर काव्यगायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. जगताप यांनी मराठी भाषा वृद्धीचा इतिहास सांगूण माय मराठीचा मोठेपणा व्यक्त करणाऱ्या कवितेचे सुर तालात काव्य गायन केले.श्रीमती उस्तुर्गे आर.आर.यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे उपाध्यक्ष तथा मराठी विषयाचे शिक्षक पवार डी.डी.यांनी वि. वा. शिरवाडकर व मराठी भाषा याबद्दल सखोल विवेचन केले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक पाचंगे आर. के. यांनी आपल्या उत्कृष्ट वक्तृत्वातून मराठी भाषेचे महत्व विशद केले.

 मराठी भाषेचा गोडवा गाणाऱ्या व भाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या कार्यक्रमाचे सुंदर व ओघवत्या शैलीमध्ये श्री कांबळे एस.ए. सरांनी सूत्रसंचालन केले व श्री  बिराजदार आर.ए. यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

या मराठी भाषा कृतज्ञता सोहळ्याला  शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते या सर्वांनी शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments