राष्ट्रसंत वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज मार्ग नामकरण करुन फलकाचे अनावरण करण्यात यावे यासाठी निवेदन
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी जी शेख) महात्मा बसवेश्वर चौक ते गुळ मार्केट यास राष्ट्रसंत वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य मार्ग नामकरण करुन फलकाचे अनावरण करण्यात यावे यासाठी निवेदन दिले. दिनांक ०५/ ० ९/ २०२० रोजी शिवा लिंगायत युवक संघटनेच्या वतीने यासाठी निवेदन देण्यात आले होते त्यानुसार दि .१२/ ०२/ २०२१ च्या लातूर शहर महानगरपालीकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत महात्मा बसवेश्वर चौक ते जुना गुळ मार्केट चौक या मार्गास वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज मार्ग तसेच बसस्थानकाजवळील शाहु कॉलेजकडे जाणाऱ्या रोड चौकासही वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलींग शिवाचार्य महाराज चौक असे नाव देण्याचा ठराव मंजुर करण्यात आला आहे. योगायोगाने येत्या 25 फेब्रुवारीला वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलींग शिवाचार्य महाराज यांची जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधुन वरिल दोन्ही ठिकाणी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने नामफलक अनावरण करण्यात यावे. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील, अॅड विजयकुमार कोरे, त्र्यंबक स्वामी, अॅड योगीराज कल्याणी , राजेंद्र बिराजदार ,शिवहार वाडकर यांच्या स्वाक्षर्या आहेत.

0 Comments