Latest News

6/recent/ticker-posts

सोशल मिडियाद्वारे नगराध्यक्षाकडून निलंगा शहरवासीयांना आवाहन

सोशल मिडियाद्वारे नगराध्यक्षाकडून निलंगा  शहरवासीयांना आवाहन


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) विदर्भ व इतर जिल्हयामध्ये ( कोविड -19 ) कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता निलंगा नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्रीकांत उर्फ बाळासाहेब शिंगाडे यांनी सोशल मीडियाद्वारे निलंगा शहरातील जनतेला खालील प्रमाणे आवाहन केले आहे. 
निलंगा शहरातील सुजान नागरिकांना सप्रेम नमस्कार
पुन्हा आपल शहर आपली जबाबदारी
होय हा आपला निलंगाच आहे. गतवर्षी 2020 मधील निलंगा शहरात पसरलेला हा शुकशुकाट तुमच्या काळजाचा ठोका चुकविल्या शिवाय राहणार नाही. संवेदनशील मन असलेले आपण सर्वजण, आपल्या निलंगा शहराचे असे चित्र पाहताना तुम्हाला नक्कीच काळजी वाटत होती यात शंका नाही. परंतु आता 2021 मध्ये कोरोना विदर्भ व इतर जिल्हा मध्ये ज्या गतीने पसरतोय ती गती आपल्याला पुढील काळात म्हणजे आजपासून नवे आतापासूनच ब्रेक निलंगा शहरात करावाच लागेल. प्रशासन आणि निलंगा नगरपरिषद आपापल्या परीने तुम्हा सर्वांसोबत नक्कीच आहे. आपणही सर्वजण त्यासाठी प्रयत्न घेतच आहात, पण ते पुरेसे नाहीत. आपल्याला आणखी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे . आता गरज आहे ती आपल्या सर्वांच्या सहकार्याची आपण सर्वजण आपापल्या कुटुंबाचे कुटुंबकर्ते आहात, आपलं कुटुंब फक्त आपल्यावरच अवलंबून आहे,  अशावेळी तुम्हीच आजारी पडलात तर कसे चालेल . हयगय करून चालणार नाही आपल्याला आणखी थोडी कळ सोसावी लागणार तुम्ही करत असलेली गर्दी सध्या सगळ्यात मोठी समस्या झाली आहे . तुम्ही 100 टक्के सोशल डिंस्टन्स पाळल पाहिजे. मास्क , सॅनिटायझर चा वापर करावा, अनावश्यक प्रवास व गर्दी टाळावी प्रशासन ने दिलेल्या सूचना पाळाव्यात असे आवाहन नगराध्यक्ष श्रीकांत उर्फ बाळासाहेब शिंगाडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments