जिजाऊ प्रतिष्ठानाच्या वतीने शिरोळ येथे सर्व निदान शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन
केळगाव:(प्रतिनिधी वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथे आज जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास निलंगा तालुक्याचे तहसीलदार गणेश जाधव व लातूर येथील विविध तज्ञ डॉक्टर व मार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथे जिजाऊ प्रतिष्ठान व समस्त गावकर यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तहसीलदार गणेश जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित डॉक्टर मारुती कराळे, डॉक्टर नंदकुमार डोळे, डॉक्टर प्रमोद लोकरे, फोटो प्रियंका जाधव, नारायण नागमोडे, डॉक्टर प्रदीप खोकले, रवींद्र सुरवसे, राहुल उमरे, डॉक्टर स्वाती पाटील ,डॉक्टर ज्ञानेश्वर सूर्यवंशी, व तसेच भालचंद्र ब्लड बँकेचे कर्मचारी सह विविध क्षेत्रातील उपस्थित प्रमुख पाहुणे सर्व मान्यवरांचे जिजाऊ प्रतिष्ठान शिरोळ यांच्या वतीने शिवरायांची प्रतिमा देऊन सर्वच मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. त्यावेळी गावचे प्रथम नागरिक गावचे सरपंच यांनी सुरवातीला रक्तदान करून रक्तदानाची सुरुवात केली त्याबद्दल तहसीलदार गणेश जाधव यांनी त्यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला त्यावेळी तज्ञ डॉक्टर यांच्या वतीने अनेक रोगावर तपासणी करून त्यांना औषध उपचार करून त्यांना योग्य सल्ला देण्यात आला त्यावेळी आठशे लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर 36 लोकांनी रक्तदान करून या शिबिरात सहभाग नोंदवला.एकंदरीत पाहता कोविड १९ नियमाचे पालन करत सर्व उपस्थित व्यक्तींनी मास्क याचा वापर केला.व एक आदर्श शिवजयंतीची प्रचिती जिजाऊ प्रतिष्ठानाच्या वतीने संपूर्ण निलंगा तालुक्यासाठी एक संदेश देण्यात आला. कुठलाही गाजावाजा न करता डीजेचा आवाज न करता अगदी सामाजिक बांधिलकी जपत या प्रतिष्ठानच्या माध्यमाने चांगला उपक्रम राबवला त्याबद्दल निलंगा तहसीलदार गणेश जाधव यांनी जिजाऊ प्रतिष्ठान व नागरिकांचे अभिनंदन कौतुक केले. पुढील काळात सुद्धा जिजाऊ प्रतिष्ठान च्या वतीने समाजोपयोगी कामे होत जावी त्यांनी समाजोपयोगी कामे हाती घ्यावी या चांगल्या कार्यासाठी तहसीलदार गणित जाधव यांनी शुभेच्छा दिल्या; त्यावेळी शिबिरामध्ये केळगाव, कलांडी, गिरकचाळ सह परिसरातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते.

0 Comments