Latest News

6/recent/ticker-posts

छत्रपती शाहू महाराज चौक येथे शिवजयंती साजरी

छत्रपती शाहू महाराज चौक येथे शिवजयंती साजरी 


चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} येथील छत्रपती शाहू महाराज चौक येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी सकाळी साजरी करण्यात आली. चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक खंडू दर्शने यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी, सुशील वाघमारे ,गजानन शिंदे ,अश्विन भोसले , ऍड संतोष गंभीरे , जी. बी जमादार , शिवाजी सूर्यवंशी बालाजी सूर्यवंशी ,धनराज सूर्यवंशी, राम कसबे,सुनील जाधव, माधवराव सूर्यवंशी,गोपाळ यनकफळे,वसंत कांबळे, अशोक कांबळे  बालाजी सुगावे रवी कीनिकर पपन कांबळे, खडके भगवान , धुप्पे गुरुजी, रमाकांत सुवर्णकार , माधव वागलगावे, सुभाष भोसले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments