स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण
निलंगा:( प्रतिनिधी/इरफान शेख )महाराष्ट्र विद्यालय,निलंगा येथे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर (माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष) यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. जयंतीनिमित्त सर्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे यांच्या मार्फत दिनांक 08 ते 14 नोव्हेंबर 2020 दरम्यान बालदिवस सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये Online बिराजदार आर ए यांच्या Facebook माध्यमातून सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेतील 34 यशस्वी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनामार्फत प्राप्त झालेल्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तसेच गणित या विषयांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना डाॕ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्हे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक पाचंगे अध्यक्षस्थानी होते. तसेच उपमुख्याध्यापक पवार आणि पर्यवेक्षिका श्रीमती देशमुख मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसांचे व प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांचे कौतुक करण्यात आले आणि काही विद्यार्थ्यांनी दादासाहेबांच्या जीवनाचा पट आपल्या भाषणाच्या माध्यमातून मांडला. शरद सोळुंके सर यांनी दादासाहेबांच्या जीवनावरती आपले विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील ए.एम. यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments