अन्न प्रक्रिया उद्योगासाठी वैयक्तीक लाभार्थ्यांचे प्रस्ताव दाखल करावेत
लातूर:(जिमाका) दि.10 - केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत PMFME प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन ही योजना असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राबविली जाणार आहे. या योजने अंतर्गत केंद्र शासनाने लातूर जिल्हयासाठी एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) या बाबीखाली टोमॅटो या पिकास मंजूरी दिलेली आहे. ही योजना सन 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षात राबविली जाणार आहे
या योजने अंतर्गत लातूर जिल्हयातील वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांसाठी लातूर जिल्हयास सर्व साधारण प्रवर्ग 13 व अनु.जाती करीता 1 असे एकूण 14 प्रक्रिया उद्योगाचे लक्षांक प्राप्त आहे. या योजने अंतर्गत वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना एकूण प्रकल्प किमतीच्या 35 % व कमाल रु.10.00 लाख या मर्यादेत अनुदान देय राहील. लाभार्थी हिस्सा हा प्रकल्प किमतीच्या किमान 10 % असेल व उर्वरीत बँकेचे कर्ज असणे बंधनकारक आहे.
या योजने अंतर्गत अर्थसहाय्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या वैयक्तीक सुक्ष्म उद्योगांना भांडवली गुंतवणुकीसाठी सहाय्य करण्याकरीता ODOP या धोरणानूसार टोमॅटो प्रक्रिया संबंधीत उत्पादन घेत असलेल्या उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल. तथापि कार्यरत उद्योग जर अन्य उत्पादन घेत असतील तर त्यांना देखील या योजने अंतर्गत सहाय्य केले जाईल. मात्र नविन उद्योजकांच्या बाबतीत जे उद्योग टोमॅटो प्रक्रिया वर अधारीत आहेत त्यासाठीच अर्थसहाय्य करण्यात येईल.
वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना योजने अंतर्गत सहभागी होण्याकरीता ऑनलाईन पोर्टल सुरु झाले आहे. या करीता अर्जदारांची नोंदणी व अर्ज भरण्याकरीता https://pmfme.mofpi.gov.in/ या वेबसाईटचा वापर करावा.
अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयातील तंत्र सहाय्यक एम.एम. निटूरे मो. नं. 9422750401 यांच्याशी संपर्क करावा/ www.krishi.maharashtra.या. संकेत स्थळाला भेट द्यावी. जिल्हयातील वैयक्तीक लाभार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अन्न प्रक्रिया उद्योगासाठीचे जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,डी.एस.गावसाने यांनी केले आहे

0 Comments