Latest News

6/recent/ticker-posts

आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते पावणेदोन कोटींच्या शेतरस्ते खडीकरण व मजबुतीकरण कामांचा शुभारंभ

आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते पावणेदोन कोटींच्या शेतरस्ते खडीकरण व मजबुतीकरण कामांचा शुभारंभ


आमदारांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांशी साधला संवाद

औसा:( तालुका प्रतिनिधी/बालाजी उबाळे ) मतदारसंघातील शेवटचा शेतरस्ता होवू पर्यंत आपला आमदार निधी दिला जाईल निधी कमी पडला तर निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे.दरवर्षी रास करताना चांगले शेतरस्ते नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. कित्येक वेळा रास करायला उशीर होतो, आर्थिक नुकसान होते त्यामुळेच मतदारसंघातील सर्व गावांतील सर्व शेतकर्‍यांना चांगले शेतरस्ते उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे असे मत आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले आहे. दि.२० फेब्रुवारी रोजी मनरेगा अंतर्गत याकतपुर, उजनी, एकंबी, एकंबीवाडी व तुंगी येथील १ कोटी ७५ लाख रुपयांच्या शेतरस्ते खडीकरण व मजबुतीकरण कामांचा शुभारंभ आ. अभिमन्यू पवार यांनी केला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महंत गुमानगिरी महाराज, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,संतोष मुक्ता,जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, दैवशाला कोळपाक, अॅड. श्रीकांत सुर्यवंशी, नवनाथ मस्के, सरपंच युवराज गायकवाड, शेखर चव्हाण, प्रविण कोपरकर, मजहर पठाण, विष्णुदास ओझा, अण्णाराव कोपरकर, गिरीराज सोमाणी, बालाजी वळके, गिरीराज जोशी, मधुकर रणदिवे, चंद्रकांत ढवण, प्रभाकर ढवण,काकासाहेब पाटील, जीवन चव्हाण,बाबासाहेब पाटील,फहिम शेख,राजेंद्र माने,प्रभाकर कांबळे, नायब तहसीलदार लाला काबंळे, सहाय्यक गटविकास अधिकारी पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.

यावेळी औसा तालुक्यातील याकतपूर ते जगदंबा मंदिर पर्यंत, याकतपुर ते एरंडी शेत पाणंद रस्ता,उजनी येथील एकंबी रोड ते अशोक कुलकर्णी यांच्‍या शेतापर्यंत, उजनी तेरणा नदी ते काकसपूर पर्यंत शेतरस्ता, एकंबी ते टाकळी शिव रस्ता,  एकंबीवाडी विश्‍वनाथ चव्‍हाण यांच्‍या शेतापासुन ते बिरवली शिवरस्ता, एकंबी ते मासुर्डी रस्‍त्‍याचे व तुंगी येथील मोरंडी ते दापेगांव पर्यंत शेतरस्‍ता खडीकरण व मजबुतीकरण आशा १ कोटी ७५ लाख रुपये कामाचा शुभारंभ आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आला. उजनी - एकंबी - जिल्हा सरहद्द या प्रमुख मार्गाची सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव अर्थसंकल्पीय मंजूरीसाठी सादर केला असल्याची माहिती यावेळी आ. पवार यांनी दिली.

Post a Comment

0 Comments