Latest News

6/recent/ticker-posts

औसा-समतानगरमध्ये महिलां मेळावा व शिवजयंती साजरी

औसा-समतानगरमध्ये महिलां मेळावा व शिवजयंती साजरी

 


औसा:(तालुका प्रतिनिधी/बी डी उबाळे) औसा येथे शिवजयंती निमित्त महिला मेळावा आणि शिवजयंती साजरी करण्यात आली. कल्पनाताई डांगे यांच्या संकल्पनेतून महिला मेळावा आणि शिवजयंती हे दोन्ही कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आले. परस्त्रीचा सन्मान करणारे शिवराय परस्त्री मातेसमान हि शिकवण देणारे शिवराय, मुस्लिमांना आपल्या सैन्यात प्रमुख पदे देणारे शिवराय, गनिमी काव्याचे तंत्र वापरून बलाढ्य शत्रूला जेरीस आणणारे शिवराय, सरंजामशाही कालखंडात टाकाऊ परंपरा मोडीत काढणारे शिवराय, साम्राज्यांशी रयतेसाठी टक्कर घेणारे शिवराय, रयतेचे राजे शिवाजी महाराज यांना शुक्रवार दि १९ फेब्रुवारी २०२१ रोजी ३९१ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका कीर्तीताई कांबळे, मंजुषाताई हजारे, माजी नगरसेवक कांबळेताई, सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कांबळे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मोठ्या सन्मानाने सर्वांच्या उपस्थित कल्पनाताई डांगे यांना देण्यात आले. कार्यक्रमामध्ये लहान मुलांनी शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणे केले तसेच शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगावर  आधारित पोवाडे गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन डांगे ताईनी केले.

Post a Comment

0 Comments