Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी वाटप केले मास्क

कोरोना आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी वाटप केले मास्क


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी जी शेख)दि.२४ - कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांनी १००००(दहा हजार) मास्क वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने काही ठिकाणी आज मास्क वाटप करण्यात आले.

कोविड-१९ या आजाराचा प्रादुर्भाव शहरात होऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच नगराध्यक्षांनी काळजी  घेतली होती. यापूर्वी त्यांनी प्रसिद्ध असलेला माळेगावचा काढा असलेले किट वाटप केले होते. ज्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे आशा घरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. हा सर्व खर्च त्यांनी स्वतः केला होता. कोरोना आजाराची दुसरी लाट पसरत असलेल्या अफवा कडे पाहून दक्षता म्हणून शहरात विना मास्क फिरणाऱ्या लोकांसाठी मास्क वाटपाचा निर्णय घेतला व आज काही ठिकाणी वाटप केले. त्यांच्या या निर्णयाचे शहरात स्वागत केले जात आहे.

Post a Comment

0 Comments