Latest News

6/recent/ticker-posts

नळेगाव येथे महारक्तदान शिबिर;111 रक्तदात्यांनी केले रक्तदान

नळेगाव येथे महारक्तदान शिबिर;111 रक्तदात्यांनी केले रक्तदान


नळेगाव:(प्रतिनिधी बाळासाहेब बरचे)दि.20 - नळेगाव येथे वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा लातूर जिल्याचे पालकमंत्री मा.ना.अमित विलासरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त नळेगाव येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैलेश उटगे, जि.प.चे मा सदस्य रामरावजी बुदरे, तालुका काॕग्रेसचे अध्यक्ष  विलासराव पाटील चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नळेगाव चे सरपंच ताजोद्दीन घोरवाड़े, उपसरपंच रवि शिरूरे, ओमप्रकाश झुरुळे, प्रवीण सूर्यवंशी, शमीमजी कोतवाल, सलीम भाई ताबोळी, पप्पू भाई शेख, अजीत बुदरे, बालाजी कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिरामध्ये 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे रक्तदान यशस्वितेसाठी अमोल नळेगावकर, जाफर घोरवाडे, असिफ कोतवाल, गोविंद बिराजदार, शुभम तांदळे, फैसल कोतवाल, महेश तोडकरी, गजानन बिराजदार, कल्लेश्वर पाटील, सादिक मुजावर, समीर जहागिरदार, साईनाथ कमठाणे, किशोर तोंडारे, वैभव पाटील, गणेश तोडकरी, बाळू अलमले, केतन बिराजदार आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments