चाकुर तालुक्यात 314 रक्तदात्यांनी केले रक्तदानन;नळेगांव १११,चापोली६५,वडवळ (ना)५५,रोहीणा ४३,जानवळ ४०
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) लातुर जिल्ह्याचे पालकमंञी,महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंञी अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त लातुर जिल्हा कॉग्रेस पार्टीच्या वतीने २१०० रक्त संकलन संकल्प करण्यात आले होते.चाकुर तालुक्यातुन प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल मध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन रक्तदात्यांन कडुन रक्तदान करुन घेतले.सध्या लातुर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.राज्यात व जिल्हात रक्तांचा तुटवडा होऊ नये म्हणून चाकुर तालुका कॉग्रेस पार्टीच्या वतीने तालुक्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.नळेगाव जिल्हा परिषद सर्कल मधुन विक्रमी १११ रक्तदान झाले.चापोली जिल्हा परिषद सर्कल मधुन ६५ रक्तदान झाले,वडवळ ना.जिल्हा परिषद सर्कल ५५ रक्तदान,रोहिणा जिल्हा परिषद सर्कल मधुन ४३जणांनी रक्तदान केले, जानवळ जि.प.सर्कल मधुन ४०,रक्तदान झाले.चाकुर तालुक्यात एकुण ३१४ जणांनी रक्तदान करुन आपले योगदान दिले.नळेगांव व चापोली मध्ये रक्तदान शिबिरांचे उदघाटन कॉग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्रीशैल्य उडगे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी एकनाथ पाटील,ओमप्रकाश झुरुळे, विलासराव पाटील,प्रविण सुर्यवंशी, रामराव बुदरे,गंगाधर केराळे,शेख पप्पुभाई,सलीमभाई तांबोळी,उपस्थित होते. तर तालुक्यातील प्रत्येक सर्कल मध्ये रक्तदान करण्यासाठी आण्णासाहेब पाटील,ताजोध्दीन घोरवाडे, रवी शिरूरे, शमीम कोतवाल, बालाजी कांबळे, नारायण चाटे,राम पाटील,सिराज देशमुख, निलेश देशमुख, डॉ पुंडलिक चाटे, युसुफ शेख, मुरलीधर सोनकांबळे, बालाजी गंदगे,नूर पटेल, वैभव पाटील, सुरेश मुंढे,संतोष पाटील, भुजंग केंद्रे,नागनाथ पकाले, नर्सिंग वाघमारे, करण भिंगोले, महादू पाटील, सचिन अनारूपे, राहुल कसबे,प्रविण कुलकर्णी, वैभव मोहनाळे,अजीत बुदरे, फैजल कोतवाल,इम्रान शेख,समीर जहागीरदार,शेषेराव जोगदंड,समीर शेख,विश्वनाथ पाटील,रिजवान देशमुख,निसार देशमुख,सिराज शेख,भाऊसाहेब पाटील,वाघमारे,सचिन रेड्डी, किरण ऐकलिंगे, ऋषिकेश मुंढे, कैलास कांबळे, देविदास कांबळे,किरण भिगोले,बापु कोते रेड्डी,सुशिल पाटील,रामकिशन चलाने,सुशिल अनुरुपे,कुलदीप पवार, हणमंत बरले,विठ्ठल केंद्रे,बालाजी बेडके,मनसुर शेख,भेटे नागनाथ,बाशीद पटेल,नरसिंग भुरे,वैभव मोहनाळे,नागेश बुरुळे,विशाल लंगोरे,मोहन जाधव,ज्ञानेश्वर मधुकर पवार, वैजनाथ भिंगोले,माधव केंद्रे,आदि सर्वा जणांना रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

0 Comments