Latest News

6/recent/ticker-posts

बोरसुरी उस्तुरी शेत रस्त्याने घेतला मोकळा श्वास

बोरसुरी उस्तुरी शेत रस्त्याने घेतला मोकळा श्वास


पावसाळ्यात शेतक-यांचे जाणे येणे गुडघाभर चिखलातुन 

कासार बालकुंदा:( प्रतिनिधी ) निलंगा तालुक्यातील  बोरसुरी ते उस्तुरी दीड किमीच्या शेतरस्त्याचे मातीकाम पुर्ण झाले असुन गत अनेक वर्षापासुन असलेली शेतक-यांची मागणी पुर्ण होऊन या उस्तुरी-बोरसुरी रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. वाक्सा शिवारातील जवळपास ६० ते ७० शेतकरी शेताकडे जाण्यासाठी उस्तुरी-बोरसुरी रस्त्याचा वापर करत होते परंतु रस्ता अरुंद असल्याने शेतातुन धान्याची रास आणायचे असेल तर शेतक-यांच्या शेतातील पिके काढायची वाट पाहायचे त्यातच पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघाभर चिखल होत असल्याने पावसाळ्यात गाई,बैल व म्हशींना शेतातच बांधावे लागत असे.शेतात जनावरांना चारा पाणी करण्यासाठी पावसाळ्यात पायात चप्पल बुट हातात धरुन गुडघाभर चिखलातुन शेताकडे जावे लागत असल्याने या शिवारातील शेतकरी बांधव वैतागुन गेले होते.शेताकडे जाण्यास रस्ता नसल्याने या शिवारातील शेतकरी शेतात पाणी असुनही ऊसाची लागवड करत नव्हते त्यामुळे उस्तुरी-बोरसुरी शेतरस्ता व्हावा यासाठी शेतक-यांनी अनेकदा प्रयत्न केले.आपल्या गावातील शेेतक-यांची ही व्यथा सरपंच मल्लिकार्जुन दानाई यांनी औसा विधानसभा मतदारसंघाचे आ.अभिमन्यु पवार यांच्याकडे मांडली. आपल्या मतदारसंघातील शेतक-यांना रस्त्याअभावी होत असलेला ञास पाहुन स्थानिक आमदार निधीतुन शेतरस्ते,पाणंदरस्ते व शिवरस्ते बनविण्यासाठी एक वेगळाच पॅटर्न राबविण्याचे कार्य आ.अभिमन्यु पवार यांनी याचवेळी हाती घेतले होते.त्यांनीही तत्काळ जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी,पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,उपविभागीय अधिकारी विकास माने,तहसिलदार गणेश जाधव यांना उस्तुरी येथे आणुन सदरील रस्त्याचे भुमिपजन केले.गेल्या अनेक वर्षापासुन शेतक-यांची असलेली रस्त्याची मागणी पुर्ण होऊन जवळपास दीड किलोमीटर रस्त्याचे मातीकाम झाले असुन पावसाळ्यात शिवारातील पाणी ओढ्याला आणण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुस नालाही घेण्यात आले आहे.एकुण १ लाख ५३ हजार खर्च करुन बनविण्यात आलेल्या या रस्त्यास आमदार निधीतुन प्रतिकिमी ५० हजार मिळाले असुन उर्वरित रक्कम शेतक-यांच्या लोकवाट्यातुन करण्यात आले आहे.पुर्वी ज्या रस्त्यावरुन बैलगाडी जाणे मुश्किल होते त्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असुन एका वेळेस दोन बैलगाडी जातील असा रस्ता बनविण्यात आले आहे.शेताकडे जाण्यासाठी रस्ता झाल्याने शेतक-यांच्या धान्याच्या राशी वेळेवर होणार असुन कारखानाच्या गाडी शेतात आणता येणार असल्याने ऊसाची लागवडही होऊन त्यांचे उत्पन्नही वाढणार असल्याने या शिवारातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments