भादा जि.प. प्रशाला "आदर्श शाळा" म्हणून विकसीत होणार;महाराष्ट्रातील पहिल्या टप्यातील 488 शाळांचा समावेश
बी डी उबाळे
औसा: महाराष्ट्रातील एकूण 488 शाळा विकसित होण्यासाठी यांचा समावेश करण्यात आला आहे. औसा तालुक्यातील भादा जि. प. प्रशाला हि आदर्श शाळा म्हणून विकसीत होणार असल्याचा शासकीय निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शासनाकडून सदर आदर्श शाळेमध्ये वाढता लोकसहभाग, भविष्यात वाढती पटसंख्या व किमान शंभर ते दीडशे पटसंख्या, आकर्षक शाळा इमारत, विद्यार्थी संख्येनुसार वर्गखोल्या, मुला-मुलीसाठी व सी डब्ल्यू एस एन स्वतंत्र व पुरेशी स्वच्छतागृहे, पेयजल सुविधा व हँडवॉश स्टेशन, मध्यंन्ह भोजनासाठी स्वयंपाक गृह भांडारकक्ष, शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य, ग्रंथालय/वाचनालय, संगणक कक्ष, व्हर्चुअल क्लास ची सुविधा, शाळेत विद्युतीकरण सुविधा, शाळेला संरक्षक भिंत, आपत्ती व्यवस्थापनासाठी शाळेतील फायर एक्झीटींग सह इमर्जन्सी एक्झीट ची सुविधा उपलब्धता, परिसरातील शाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यासाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे,उत्कृष्ट शिक्षकांना देशांतर्गत व देशाबाहेरील प्रशिक्षणासाठी पाठविणे, इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेणे या सुविधा सदरील शाळांमध्ये उपलब्ध होणार आहेत. सदरील पत्र पाहताच या शाळेचे पूर्व मुख्याध्यापक आणि सध्या सेवानिवृत्त असलेले भारत सातपुते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्जुन लटुरे आणि सध्या या शाळेवर मुख्याध्यापक असलेली रमेश आनंतवार यांनी याबाबत शाळेला सुविधा मिळणार असल्याने आनंद व्यक्त केला. भविष्यात शाळेला मिळणाऱ्या सर्व सेवा सुविधांचा लाभ येथील सर्व विद्यार्थ्यांना कसा मिळेल याबाबत दक्ष राहणार असल्याचे मत यावेळी मुख्याध्यापक आनंतवार यांनी आपला मानस व्यक्त केला आहे.

0 Comments