Latest News

6/recent/ticker-posts

औशात 63 वा वर्धापन दिन एम आय एम कडून साजरा

औशात 63 वा वर्धापन दिन एम आय एम कडून साजरा


बी डी उबाळे

औसा:ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम पक्षाचा 63 वा वर्धापन दिन शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दि. 2 फेब्रुवारी 2021 मंगळवार रोजी सकाळी एमआयएम नेते  अॅड. गफरुल्ला हाश्मी व तालुका एमआयएम प्रमुख सय्यद मुजफ्फर आली ईनामदार यांच्या उपस्थितीत शहरातील जलाल शाही चौक येथे एमआयएम पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना (कोव्हिड -19) महामारीच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य सेतू ॲप नियमांंचे पालन करत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी एमआयएम नेते अॅड. गफरुल्ला हाश्मी व तालुका सय्यद मुजफ्फर अली ईनामदार यांनी आपले विचार व्यक्त व्यक्त केले, पक्षाची स्थापना 1927 साली झाली. सुरुवातीला या पक्षाचा आवाका फक्त तेलंगणपुरताच मर्यादित होता.1984 पासून हा पक्ष सतत हैदराबाद लोकसभेची जागा जिंकत असतांना हा पक्ष इतर राज्यांमध्ये आपली जागा बनवत आहे. पक्षाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याने देशात राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एमआयएम पक्षाची दिवसंदिवस लोकप्रियता वाढत आहे, पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन त्यांच्या समस्या व विकासासाठी प्रयत्न करत आहे, असे या प्रसंगी मत व्यक्त करण्यात आले. यावेळी रुकमोद्दीन आळंदकर, सलीम शेख, सिराज शेख, नययुम शेख, माजिद पटवेकर, अमजद शेख, हाजी शेख़, अखिल शेख, नाजम शेख़, सलमान पटेल उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments