Latest News

6/recent/ticker-posts

एकरी काढले 90 टन ऊसाचे उत्पादन;शेंद येथील शेतकरयाची प्रयोगशील शेती

एकरी काढले 90 टन ऊसाचे उत्पादन;शेंद येथील शेतकरयाची प्रयोगशील शेती



 
के वाय पटवेकर

निटूर:- निलंगा तालुक्यातील शेंद येथील शेतकऱ्याने एका एकर मध्ये चक्क 90 टन उसाचे उत्पादन घेतल्याने परिसरात त्या शेतकऱ्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. निलंगा तालुक्यातील शेंद येथील शेतकरी राहुल अशोक सूर्यवंशी हे लातूर येथे होस्टेल चालवत होते परंतु लॉकडाऊन मध्ये आपल्या शेंद गावी येऊन ते शेतीकडे वळले 25 फेब्रुवारी 2020 ला एक एकर क्षेत्रामध्ये 86032 गोल्ड या उसाची लावण केली.  त्यामध्ये ऊस पट्टा पद्धतीने चार फूट सरी मध्ये दोन डोळा पद्धत लावण केली. नववीन तंत्रज्ञान व जैविक औषध फवारणी  करून उसाची वेळोवेळी निगा केली. ऊस चांगला जोरदार आला असून  उसाची उंची जवळ-जवळ वीस ते बावीस फूट पोचून 30 ते 32 कांडयावर गेला .एक एकर मध्ये चक्क 90 टन इतके उत्पादन मिळाले आहे. आपल्या नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर व जैविक खताचा वापर करून या तरुण शेतकऱ्याने उसाची निगा करून ऊस चक्क तीस ते बत्तीस कांड्यावर आणला आहे. त्यामुळे या ऊसाला पाहण्यासाठी मुगाव ,ताजपुर, हलकी ,निटूर सह परिसरातील अनेक शेतकरी उसाच्या फडाला जाऊन भेट देत आहेत, व राहुल सूर्यवंशी या प्रयोगशील शेतकऱ्यालां ऊसाविषयी विचारपूस करत आहेत. एक एकर मधी 90 टन ऊस उत्पादन घेतलं  या शेतकऱ्याची व उसाची परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे.

जैविक खताचा वापर करून स्वतः औषधाची निर्मिती करून उसाची फवारणी केली व वेळोवेळी तिची योग्य काळजी घेतली त्यामुळे वीस ते बावीस फुटापर्यंत जाऊन तीस-पस्तीस काढण्यापर्यंत भरला यापुढे शंभर टक्के जैविक खताचा वापर करून एकशे वीस टनापर्यंत एकरी उसाचे उत्पन्न घ्यायचा निश्चय केला आहे.

-राहुल अशोक सूर्यवंशी, शेतकरी (शेंद)

Post a Comment

0 Comments